शेतकरी मुद्द्यावरून काँग्रेसवर राणेंची टीका

कृषी विधेयकाला समर्थनांत कणकवली मध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली

शेतकरी मुद्द्यावरून काँग्रेसवर राणेंची टीका

कणकवली: केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कणकवली येथे भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील,आ.नितेश राणे यावेळी उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला, त्यांनी उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो? हे तरी त्यांना माहिती आहे का?,असा सवाल भाजपाचे खा.नारायण राणे यांनी केला आहे.
७० वर्षात काॅंग्रेसला शेतकऱ्यांसाठी काहीच जमले नाही, आता मात्र आंदोलन आणि विरोध करत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला देखील बंधने, कायदे होते. मला कुठे विकायचा? कसा विकायचा? दलाला मार्फत विकायचा मग कष्टाचे पैसे मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. हे गेले ७० वर्षांतील कायदे पंतप्रधानांनी मोडीत काढले आहेत, असे म्हणत नारायण राणेंनी काँग्रेसवर टीका केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.