कोविड सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग, शहरातील दुसरी घटना

पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटरमधील घटना..

कोविड सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग, शहरातील दुसरी घटना

औरंगाबाद : पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरने रुग्ण महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असताना आता पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका तरुणीला अंघोळ करत असताना कुणीतरी बघण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तिने डॉक्टरांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलीसांना पाचारण करण्यात आले होते, तरुणीसमोर रुग्णांची ओळख परेड देखील झाली पण यापैकी कोणी नसल्याचे स्पष्ट झाले.
------------5
पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटरमध्ये महिलांचा वॉर्ड खालच्या मजल्यावर तर पुरुषांचा वॉर्ड वरच्या मजल्यावर आहे. शुक्रवारी तरुणी अंघोळीसाठी गेली तेव्हा वरच्या मजल्यावरुन कोणीतरी तिला पाहीले असल्याची तक्रार तिने डॉक्टरांकडे केली. त्यांनी अगोदर हा प्रकार पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. अधिकाऱ्यांनी पोलीसांना बोलावले आणि ओळख परेड केली मात्र यातून काही निष्पन्न झाले नाही. पोलीसांनी तरुणीला तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला पण अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.