मजूर महिलेवर अतिप्रसंग; गुन्हा दाखल

घरात एकटी असताना महिलेचे तोंड दाबून बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केला...

मजूर महिलेवर अतिप्रसंग; गुन्हा दाखल

परभणी : गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे ऊसतोडणीचे काम करणाऱ्या एका २० वर्षीय मजूर महिलेवर एका आरोपीने अतिप्रसंग केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवारी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव दुधाटे येथे शेतामध्ये काम करणारी ऊसतोडणीस असलेली २० वर्षीय मजूर महिला याच गावातील रहिवासी आहे. बळीराजा साखर कारखान्यामध्ये तिचा नवरा व फिर्यादी महिला ऊसतोडणीचे काम करतात. रविवारी दिवसभर देऊळगाव दुधाटे गाव शिवारामध्ये ऊसतोडणीचे काम करून गाडी भरून दिल्यानंतर महिला घरी आली. सायंकाळी सात वाजता तिच्या घरात भाकरीसाठी पीठ नव्हते. म्हणुन तिने नवऱ्याला दळण घेऊन येण्यास सांगितले. नवरा साडेसात वाजता दळण आणण्यासाठी गावात गेला. रात्री उशिरापर्यंत आलाच नाही. त्यामुळे सदर पीडित महिलेने भात करून खाल्ला व ती घरामध्ये झोपली. तेव्हा आरोपी प्रल्हाद दुधाटे हा त्या महिलेच्या घरात घुसला. सदर महिलेचे तोंड दाबून बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केला. सदर घटना तिने शेजार्यांना सांगितली. नवरा घरी आल्यानंतर तिने सासू-सासर्यांच्या कानावरही हा विषय घातला. त्यानंतर मंगळवारी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून गंगाखेड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदविली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी प्रल्हाद दुधाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.