निटूरात सापडले दुर्मिळ खवल्या मांजर...!

1 min read

निटूरात सापडले दुर्मिळ खवल्या मांजर...!

खवल्या मांजर हे अतिशय दुर्मिळ होत असून त्याची तस्करी केली जाते...

निटूर: निटूरमध्ये मंगळवारी दुर्मिळ खवल्या मांजर मिळून आले. अच्युत सोमवंशी यांच्या घरामध्ये हे खवल्या मांजर मिळून आले.
मंगळवारी राञी सोमवंशी यांच्या घरी माळवद व सरीच्या खालच्या बाजूला काही तरी विचित्र प्राणी दिसून आला. त्याला हूसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता तो प्राणी अजिबात हलत नव्हता. त्यामुळे सोमवंशी कुटूंबीय घाबरून गेले.
सोमवंशी यांच्या घरात काहीतरी प्राणी असल्याची माहिती गावात कळताच पाहण्यासाठी एकच गर्दी झाली.
दरम्यान, गावातील कांही लोकांनी वन विभागाला या संदर्भात माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तासभर परीश्रम करून खवल्या मांजर आणि सोमवंशी कुटुंबाचीही सुटका केली. खवल्या मांजर हे अतिशय दुर्मिळ होत असून त्याची तस्करी केली जाते...