राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

मुंबई: शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची  बातमी समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीत असं काही झालं नाही. मराठा आरक्षण,कोरोना,लसीकरणासह अनेक विषय असून, यावर चर्चा होऊ शकत नाही का? राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का? अफवांवर विश्वास ठेऊ नका, अफवा पसरवण गुन्हा आहे असंही ते म्हणाले.  शरद पवारांचा सरकारला मनापासून आशीर्वाद असून, हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राऊत यांच्या या विधानावरुन आता भाजपानेही टोला लगावत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर, राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात ५ तास बसून कशासाठी महायज्ञ करत आहेत, असा सवाल भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी, असा टोला देखील नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.