राऊतांची सुरक्षा वाढवली पण, अधिकाऱ्यांच्या रक्षणाचे सरकारला घेणं-देणं नाही

मराठी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचं सरकारला काही घेणंदेणं नाही

राऊतांची सुरक्षा वाढवली पण, अधिकाऱ्यांच्या रक्षणाचे सरकारला घेणं-देणं नाही

मुंबई : अनधिकृत फेरिवाल्यानं एका महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं छाटली गेली आहे. सध्या यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.आता यावरूनच भाजपचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुरक्षा वाढीवरुन जोरदार टिका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांचे निवासस्थान आणि सामनाच्या कार्यालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच संजय राऊत यांच्या सुरक्षेसाठी सहा शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यावरून, निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मराठी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचं सरकारला काही घेणंदेणं नाही, असे राणेंनी म्हटलंय.

आ. निलेश राणे यांनी टिट्ट मध्ये म्हटलं की, ‘अनधिकृत फेरीवाले हटला गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण होते. त्यांची बोटं छाटली जातात. पण अधिकाऱ्यांच्या संरक्षणाचं ठाकरे सरकारला काडीमात्र घेणंदेणं नाही. पण संज्या जो मार खायच्या लायकीचा आहे त्याचं संरक्षण वाढवलं जातं. शिवसेनेच्या खास लोकांनाच सत्तेचा फायदा होतो आहे. मात्र सामान्य शिवसैनिक फटके खातो आहे.’ अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.