राऊतांची 'ती' ऑडियो क्लिप लवकरच जाहीर करतो- राणे

राऊतांची 'ती' ऑडियो क्लिप लवकरच जाहीर करतो- राणे

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलनं केले. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगल तापले आहे. मागील दोन दिवसांपासून शिवसेनेने ‘सामना’मधून राणेंवर निशाणा साधला असतानाच आता राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरुन याच लेखातील संदर्भ घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अडचणीत आणणार असल्याचं संकेत दिले आहेत

निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, संजय राऊतांमुळे त्रस्त झालेली पीडित महिला काही कारणांमुळे न्यायालयात आपली बाजू मांडू शकली नाही, पण आम्ही हायर कोर्टात जाणार आहोत. त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत संजय राऊत तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी राऊतांचा एकेरी उल्लेख करत दिला आहे.

‘भाषेची वार्ता करतो, तर जी भाषा एका महिलेशी बोलताना संजय राऊतांनी वापरली आहे ती ऑडियो क्लिप लवकरच जाहीर करतो’, असं म्हणत निलेश राणेंनी राऊतांना धमकीवजा इशारा दिला आहे. याबाबत निलेश राणेंनी ट्वीट करत शिवसेनेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

जाहिरात

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.