प्लेगच्या साथीतील रँड महाराष्ट्र अनुभवतोय

प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर जसे अत्याचार केले अगदी तसेच महाराष्ट्रात घडतेय, मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

प्लेगच्या साथीतील रँड महाराष्ट्र अनुभवतोय

मुंबईः कोरोनाचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाउनचा इशारा देताच विरोधकांनी मात्र लॉकडाउनला विरोध दर्शविला आहे.मनसेने ठाकरे सरकारची तुलना ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.(The MNS has compared the Thackeray government to the Raynd rule during the British rule. MNS leader Sandeep Deshpande has targeted the Thackeray government in a tweet.)

मनसेचे संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारच्या कारभाराची तुलना ब्रिटिशांच्या राजवटीतील रँडच्या कारभारासोबत केली आहे. १८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँड ने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत, असा टोला संदीप देशपांडेंनी यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाउनला भाजपचा विरोध होता,आता त्यात मनसेनेने उडी घेत लॉकडाउनला विरोध केला आहे. आता शिवसेना मनसेच्या या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हला प्रत्युत्तर म्हणून संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत विरोध केला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.