RBI चा मोठा निर्णय,ऑटो-डेबिट ट्रान्झेक्शनमध्ये बदल

ऑटोडेबिट बंद, परवानगी शिवाय नाही कापले जाणार पैसे

RBI चा मोठा निर्णय,ऑटो-डेबिट ट्रान्झेक्शनमध्ये बदल

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे मोबाईल बिल, इतर युटीलीटी बिल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सबस्क्रीप्शनसाठी लागू केले जाणारे ऑटो डेबिट सिस्टीमची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 निश्चित करण्यात आली होती. मात्र, कालपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून देशात ऑटो-डेबिट ट्रान्झेक्शनमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

काय आहेत नवे निमय?

या नियमांअंतर्गत ऑक्टोबरपासून बँकांच्या ऑटो-डेबीटच्या तारखेपूर्वी पाच दिवस आधी ग्राहकांना एक नोटीफिकेशन पाठवणे अनिवार्य असेल. पैसे तेंव्हाच कट होतील, जेंव्हा त्यासाठी ग्राहक मंजूरी देईल. थोडक्यात, आता खात्यातून पैसे कापण्यासाठी ग्राहकाची मंजूरी प्रत्येकवेळी घेणे अनिवार्य असणार आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर तसेच इमेल आयडी अपडेट असणे आवश्यक असणार आहे. कारण याद्वारेच तुम्हाला ऑटो डेबिटशी निगडीत नोटीफिकेशन एसएमएस अथवा मेलद्वारे पाठवण्यात येईल.

का होतोय हा बदल?

सध्याच्या काळात अनेक लोक मोबाईल, पाणीबिल, विजबिल इत्यादी सर्व बिलांचे पेमेंट ऑटो पेमेंट मोड पद्धतीनेच करुन टाकतात. याचा अर्थ असा आहे की, हे डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म अथवा बँक ग्राहकांकडून एकदा परवानगी घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला कसल्याही परवानगी शिवायच त्यांच्या खात्यातून पैसे कापतात. या पद्धतीमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. वाढत्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी म्हणून हे नियम बदलण्यात येत आहेत.

नव्या नियमांनुसार कोणते बदल झालेत?

  1. ५००० पेक्षा कमी रकमेतील व्यवहारांसाठी अतिरिक्त घटक प्रमाणीकरण (Additional Factor Authentication - AFA) करणे अनिवार्य असणार आहे.

  2. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड केवळ अतिरिक्त घटक प्रमाणीकरणाद्वारे दिलेल्या नियम आणि सूचनांनुसार अधिकृतरित्या वापरात आणले जातील.

  3. नवीन कार्डची नोंदणी, बदल किंवा बंद करण्यासाठी अतिरिक्त घटक प्रमाणीकरण आवश्यक असणार आहे.

ग्राहकांसाठी काय बदल?

  1. ऑटो डेबिट व्यवहार होण्याच्या 24 तास आधी ग्राहक प्री -डेबिट (एसएमएस - ई -मेल) सूचना प्राप्त करेल.

  2. डेबिट नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या लिंकद्वारे व्यवहारातून ग्राहक सहजरित्या बाहेर पडू शकतो.

  3. ग्राहकाला त्यांच्या कार्डवर सेट केलेल्या कोणत्याही नोटिफिकेशन पाहण्याची, बदल करण्याची किंवा रद्द करण्याची सुविधा असेल.

  4. प्रत्येक स्थायी सूचनांसाठी जास्तीत जास्त रक्कम सेट करू शकणार.

  5. तुमच्या बँक खात्यावर इतर बिल भरण्यासाठी रजिस्टर केल्यास कोणताही बदल होणार नाही.

  6. म्युच्युअल फंड, SIP, EMI साठी बँक खात्यांचा वापर करून नोंदणी केलेल्या पाहिल्यासारखेच सुरू राहतील.

  7. नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) किंवा डीटीएच रिचार्जसाठी अनेकजण क्रेडिट कार्ड पेमेंट (Credit Card Payment), यूपीआय पेमेंट (UPI Payment) सह ऑटो पेमेंट सेवा वापरतात. AFA नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात आला. मात्र त्यावर 6 महिन्यांची सूट आरबीआयकडून देण्यात आली. परंतु, आता 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.