राज्यातील या जिल्ह्यात रेड अलर्ड

राज्यातील ५ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी

राज्यातील या जिल्ह्यात रेड अलर्ड

मुंबईः राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच राहिल्याने सखल भागातील रस्त्यांना पूर आला. यावेळी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. उंबरमाली रेल्वे स्थानक ते कसारा दरम्यान मुंबई लोकल ट्रेन अद्ययावत सेवा निलंबित करण्यात आली असून इगतपुरी ते खर्डी दरम्यानची रेल्वे सेवाही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अशात राज्यात आज आणि उद्या हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने आजही राज्यातील ५ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी येथेही गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोकणात गेल्या ४ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचे उग्र रूप पाहायला मिळत आहे.

कोकणात पुर स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसाने चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचो पाणी शहरात शिरलो आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास ५ हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानो चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत. रत्नागिरीतल्या चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.