6799 रुपये किंमतीच्या Redmi 9A मोबाईलचा सेल सुरु

1 min read

6799 रुपये किंमतीच्या Redmi 9A मोबाईलचा सेल सुरु

अ‍ॅमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवर सेल सुरू आहे.

Redmi 9A पुन्हा एकदा सेलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ग्राहक २९ सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉन आणि शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवरुन Redmi 9A खरेदी करू शकतील. हा स्मार्टफोन या महिन्याच्या सुरूवातीला लाँच करण्यात आला होता. हा Redmi 9A मालिकेचा एक भाग आहे. हे दोन स्टोरेज आणि तीन रंगामध्ये उपलब्ध आहे.

Redmi 9A च्या 2 जीबी + 32 जीबी वेरिएंटची किंमत 6,799 रुपये आणि 3 जीबी + 32 जीबी वेरिएंटची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना ते मिडनाइट ब्लॅक, नेचर ग्रीन आणि सी ब्लू कलर मध्ये खरेदी करण्यास उपलब्ध असतील. विक्री अमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवरुन होईल.

ड्यूल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 12 वर चालतो आणि त्यात 6.53 इंचाचा एचडी + (720x1,600 पिक्सल) एलसीडी डॉट ड्रॉप डिस्प्ले आहे. त्याची अंतर्गत मेमरी 32 जीबी पर्यंत आहे, जी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढविली जाऊ शकते.

Redmi 9A मध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 13 एमपीचा सिंगल कॅमेरा आणि सेल्फीसाठी पुढचा 5 एमपी कॅमेरा आहे. यात 3 जीबी रॅमसह ऑक्टा-कोर MediaTek Helio G25 प्रोसेसर आहे.
Redmi 9A ची बॅटरी 5,000 MAh असून 10 W फास्ट चार्जिंग देखील येथे सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, 4G LTE, Wi-Fi, एक 3.5mm ऑडिओ जॅक आणि मायक्रो- USB पोर्टचा सपोर्ट आहे.