अनियमित मालमत्ता नियमित करुन घ्या- खा.जलील

'एमआयएम'तर्फे मोफत मार्गदर्शन व सहकार्य कॅम्प

अनियमित मालमत्ता नियमित करुन घ्या- खा.जलील

औरंगाबाद : शहरातील अनियमित मालमत्ता प्लॉट, घर व दुकानांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याची सुवर्णसंधी महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु अनियमित मालमत्ताधारक नागरीकांना त्यांच्या मालमत्ता नियमित करण्यासाठी कागदपत्रांचे पुरेसे ज्ञान नसल्याने नागरीक वंचित राहणार होते. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीने नागरिकांना गुंठेवारी बाबत सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्या विशेष प्रयत्नाने एमआयएम पक्षातर्फे गुंठेवारी कायद्यांतर्गत सर्वसामान्य नागरीकांना लाभ मिळावा यासाठी दारुस्सलाम कार्यालय, बुड्डीलेन येथे नागरीकांना सहकार्य व मागदर्शन करण्यासाठी गुंठेवारी कॅम्पचे उदघाटन करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नागरीकांनी सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

गुंठेवारी कायद्यांतर्गत प्लॉट, घर किंवा दुकानाचे नियमितीकरण करण्यासाठी बॉन्ड पेपर, रजिस्ट्री, पी.आर कार्ड, सातबारा, खरेदीखत यासोबत लाईट बिल आणि मालमत्ता कराची पावती असल्यास सोबत आणावी. कागदपत्रांनुसार तात्काळ मोफत संचिका तयार करुन पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिकेत सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मालमत्तांचा नकाशा विनामुल्य बनवुन प्रमाणित सुध्दा करुन देण्यात येणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.