Reliance jio चे दोन नवीन प्लॅन,70 पेक्षा कमी रूपयांत 7GB डेटा

1 min read

Reliance jio चे दोन नवीन प्लॅन,70 पेक्षा कमी रूपयांत 7GB डेटा

Reliance Jio Phone च्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. कंपनीने ग्राहकांसाठी कमी दिवसांची वैधता असलेले दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन 49 रुपये आणि 69 रुपयांचे आहेत. या दोन प्लॅन्समध्ये ग्राहकांना कमी किंमतीत डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी मोफत मिनिटे मिळतात. जाणून घेऊया या दोन्ही प्लॅनमध्ये कोणत्या सुविधा आहेत.
49 रुपयांचा प्लॅन-
डिसेंबर 2019 मध्ये टॅरिफ दरवाढीनंतर कंपनीने ४९ रुपयांचा प्लॅन बंद केला होता. पण आता कंपनीने हा प्लॅन पुन्हा आणलाय. या प्लॅनमध्ये 28 दिवसांऐवजी 14 दिवसांची वैधता मिळते.या प्लॅनमध्ये जिओच्या नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी एकूण 250 मिनिट मिळतात. याशिवाय या प्लॅनमध्ये 25 फ्री एसएमएस आणि एकूण 2जीबी 4G डेटाही मिळतो.
69 रुपयांचा प्लॅन-
14 दिवसांची वैधता असलेल्या 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 7 जीबी डेटा मिळतो. 49 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे यामध्येही जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग करता येईल, तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतील.या प्लॅनमध्येही 25 फ्री एसएमएसची सुविधा आहे.