जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करा

आ. पाटील यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करा

परभणी : जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे या कालव्यातून पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे ही गेल्या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी सदर कालव्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवार दि.८ जून रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सदर कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करून वेळप्रसंगी जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही दिली असल्याचे आ. डॉ. पाटील यांनी सांगितले. आमदार पाटील यांच्यासमवेत दिनेश बोबडे, रवींद्र पतंगे, बाजार समिती संचालक तानाजी भोसले, प्रभाकर जयस्वाल, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, माजी पं. स. सभापती बाळासाहेब रसाळ वसिक ईनामदार आदींनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मंगळवारी मुंबईत भेट घेऊन जायकवाडीच्या डाव्या कालव्याचा प्रश्न मांडला. यावेळी आ. पाटील यांनी मंत्री जयंत पाटील यांना सांगितले की, सदर कालव्यावर परभणी जिल्ह्यातील ९७ हजार हेक्टर लाभक्षेत्र आहे ,परंतु कालवा नादुरुस्त असल्यामुळे पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होत नाही. विशेषतः किलोमीटर 122 येथे दोन हजार शंभर क्यूसेस वहनक्षमता असताना फक्त नऊशे ते अकराशे क्युसेस क्षमतेने पाण्याचे प्रत्यक्ष वहन होते. यात परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे ही कालव्याच्या टेल भागात आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही.पिके बहरात असताना आणि जेव्हा पिकांना पाण्याची आवश्यकता असते तेव्हाच पाणी योग्य प्रमाणात न मिळाल्याने पिकांचे नुकसान होत असल्याच्या बाबीकडे ही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले. पैठण किलोमीटर ०० ते २०८ मधील कालवा दुरुस्ती लवकरात लवकर करण्याबाबत विशेष बैठक घेण्यात यावी अशी मागणीही आ. डॉक्टर राहुल पाटील यांनी यावेळी केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.