सुमित दंडुके / औरंगाबाद.दि.२७ : हल्ली शहरात गुन्हेगारीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एक अट्टल गुंड रात्रीच्यावेळी दारू पिऊन एका मुलीसोबत नाचतानाचा व्हिडीओ आपण सर्वांनीच बघितला. त्यानंतर पुणे-अहमदनगर टोळी दरोड्याच्या पूर्ण तयारीत असताना सुदैवाने काही दक्ष पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पकडल्या गेले. नाहीतर त्या रात्री सुद्धा वेगळेच चित्र दिसले असते. यावरून शहरात गुन्हेगारांना पोलिसांची काही भीती आहे का? असाच प्रश्न पडतो.
आज फुलंब्री हद्दीत बीड येथील एका टोळीला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पकडले, पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून एक टोळी पिस्तुल विक्रीसाठी औरंगाबादला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे तयारीत असलेल्या पोलिसांनी गाडी येताच फुलंब्री हद्दीत अडवून तपास केला असता त्यात तीन पिस्तुल आणि १३ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ज्याची किंमत ७ लाख ३५ हजार एवढी आहे. या कारवाईत ५ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.
औरंगाबादेत वाढती गुन्हेगारी ; पोलिसांची डोकेदुखी.
विक्रीसाठी आणलेल्या ३ पिस्तुलसह, १३ जीवंत राउंड फुलंब्रीत जप्त

Loading...