भाजीपाल्यांचा वाढता भाव ; सर्वसामान्यांच्या जीवाला घाव

1 min read

भाजीपाल्यांचा वाढता भाव ; सर्वसामान्यांच्या जीवाला घाव

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक देखील परेशान असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सुमित दंडुके/औरंगाबाद: परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागे काही दिवस पावसाने उसंत घेतली खरी मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अगोदरच पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात पिकांची आवक खुप कमी झाली आहे. याचाच त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूर्वी ५ ते १० रुपयाला मिळणारी कोथमीर, शेपू व मेथी सध्या २५ ते ३० रुपयाना मिळत आहे. तसेच कांदे, बटाटे देखील दुप्पट भावाने विकले जात आहे. त्यामुळे परतीच्या या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक देखील परेशान असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.