दिल्लीत प्रदुषणाचा धोका कायम; घरातही मास्कचा वापर

सरन्यायाधिशांनी दिल्ली सरकारला फटकारले

दिल्लीत प्रदुषणाचा धोका कायम; घरातही मास्कचा वापर

दिल्ली- राजधानी दिल्लीतील वायूप्रदूषणाचा धोका पाहता या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. प्रदूषणासाठी शेतकऱ्यांना शिव्या देणे ही एक फॅशन झाली आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊनची सूचनाही न्यायालयाने केली आहे. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी केंद्राला सांगितले की, वायू प्रदूषण ही एक गंभीर स्थिती आहे. आम्हाला घरीही मास्क लावावे लागतात.

वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्रा सरकारला केला. दोन लाख यंत्रे शेतातील खुंट जाळण्यासाठी उपलब्ध आहेत तसेच बाजारात दोन तीन प्रकारच्या मशीन उपलब्ध आहेत. पण शेतकरी ती खरेदी करू शकत नाहीत. केंद्र/राज्य सरकारे शेतकऱ्यांना ही यंत्रे देऊन परत घेऊ शकत नाहीत का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केला.

तर दुसरीकडे धूर, धुके आणि मळभ या तिन्ही घटकांनी दिल्लीकरांना वेढले असून फुफ्फुसे निकामी करणाऱ्या ‘पीएम २.५’ या अत्यंत घातक धूलिकणांचे प्रमाण तब्बल ४०० मायक्रोग्रॅम्स प्रति घनमीटरवर पोहोचले आहे. ते निर्धारित मानकापेक्षा सहापट जास्त आहे. दोन-तीन दिवसांपासून राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील किमान तापमान सुमारे १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने जमिनीलगत वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खराब झालेली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.