रिया चक्रवर्तीला चौकशीचा मानसिक त्रास, जामीन अर्ज दाखल.

1 min read

रिया चक्रवर्तीला चौकशीचा मानसिक त्रास, जामीन अर्ज दाखल.

‘मी केवळ 28 वर्षांची असून, एनसीबीच्या तपासाव्यतिरिक्त एकाच वेळी पोलीस आणि केंद्रीय एजन्सीमार्फत तीन तपासांसोबत मीडिया ट्रायललाही सामोरं जावं लागत आहे. या सर्व गोष्टींचा माझ्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्यास माझी मानसिक स्थिती आणखी खालावेल,

मुंबई : ‘मी केवळ 28 वर्षांची असून, एनसीबीच्या तपासाव्यतिरिक्त एकाच वेळी पोलीस आणि केंद्रीय एजन्सीमार्फत तीन तपासांसोबत मीडिया ट्रायललाही सामोरं जावं लागत आहे. या सर्व गोष्टींचा माझ्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्यास माझी मानसिक स्थिती आणखी खालावेल, असे तिने आपल्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या. रिया चक्रवर्तीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, मी निर्दोष असून, एनसीबी जाणीवपूर्वक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गंभीर आरोप करत आहे. मुंबई पोलीस, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), एनसीबी, अंमलबजावणी संचालनालयच्या (ईडी) चौकशीचा संदर्भ देत, ‘मी केवळ 28 वर्षांची असून, एनसीबीच्या तपासाव्यतिरिक्त एकाच वेळी पोलीस आणि केंद्रीय एजन्सीमार्फत तीन तपासांसोबत मीडिया ट्रायललाही सामोरी जात आहे’, असे तिने मंगळवारी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे.

याशिवाय तिने जामीन अर्जात सुशांत सिंह राजपूतने ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी आपला वापर केल्याचा आरोप केला आहे. एनसीबीच्या पुराव्यानुसार सुशांतने माझा आणि भाऊ शौविकचा ड्रग्जसाठी वापर केल्याचे स्पष्ट होत असल्याचे, रियाने आपल्या याचिकेत म्हटले आहे. आम्हीच नव्हे तर, सुशांतने त्याच्या जवळच्या इतर माणसांचाही केवळ ड्रग्जसाठीच वापर केल्याचा आरोप रिया चक्रवर्तीने केला आहे.