देवेंद्र फडणवीस यांना रोहित पवार यांनी दिले प्रत्युत्तर

राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावे -रोहित पवार

देवेंद्र फडणवीस यांना रोहित पवार यांनी दिले प्रत्युत्तर

अहमदनगरः महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढताणा दिसत आहे. मात्र अस असताना मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.

कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे कौतुक केले, त्यामुळे राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादे पत्र केंद्रालाही जरुर लिहावे, असे म्हणत रोहित पवार यांनी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

'कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचे तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. तसेच कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळे राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.