'४ लाखांची चोरी अवघ्या २४ तासात उघड.'पीपीई कीट घालून पळविली तिजोरी.

1 min read

'४ लाखांची चोरी अवघ्या २४ तासात उघड.'पीपीई कीट घालून पळविली तिजोरी.

जिन्सी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई ; पीपीई कीट घालून नोकरानेच पळविली तिजोरी

सुमित दंडुके/औरंगाबाद.दि.२६ : जालना रोडवरील मुळे कॉम्प्लेक्स मधील बिल्डर संतोष धानुका यांच्या कार्यालयातील नोकरानेच अन्य साथीदारांसह रात्रीच्या वेळी तिजोरी फोडुन २ लाख लंपास केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली. सदरील घटनेबद्दल धानुका यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यावर त्वरीत कारवाई करीत गुन्हे शाखा आणि जिन्सी पोलीस ठाणे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, मयुर कऱ्हाळे(वय.२४, रा.विष्णुनगर), संतोष राणा(वय.२२, रा.नक्षत्रवाडी), सागर देवकाते(वय.२४, रा.कैलास नगर), या तिघांसह एका विधीसंघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरील गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
WhatsApp-Image-2020-10-26-at-1.09.48-PM--1-
सदरील आरोपीना न्यायालयात हजर केले असता २८ ऑक्टोम्बरपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके करीत आहे.
सदरील कामगिरी गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अधिकारी कर्मचारी, तसेच जिन्सी पोलीस ठाणे अधिकारी कर्मचारी यांनी यशस्वी पार पाडली.