नियम सर्वसामान्यांसाठी आम्ही तर खासदार

1 min read

नियम सर्वसामान्यांसाठी आम्ही तर खासदार

खासदारच नियमांचे पालन करत नसतील. नियम फक्त सर्वसामान्यांसाठी खासदारासाठी नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो.

स्वप्नील कुमावत/औरंगाबाद:- जिल्ह्याचे खासदार आणि एमआयएम चे नेते इम्तियाज जलील यांच्या कडून कोरोना महामारीच्या काळात सतत शासकीय नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. सामाजिक अंतर न राखणे, मास्क न वापरणे, या नियमांचे खासदाराकडून सतत उल्लघंन होत आहे.
शहरातील नागरिकांच्या तक्रारी ऐकताना खासदाराच्या तोंडाला मास्क नसल्याचे दिसून आले. त्यांच्या आजू बाजूला असलेल्या नागरिकांच्या तोंडाला देखील मास्क नव्हते. खासदारच नियमांचे पालन करत नसतील. नियम फक्त सर्वसामान्यांसाठी खासदारासाठी नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो.

खासदार इम्तियाज जलील लोकांच्या समस्या ऐकत असताना. त्यांच्या सभोवताली उभ्या असलेल्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. खासदार त्यांना एक शब्द देखील बोलत नाही. खासदारांच काम आहे. नागरिकांना नियमांचे पालन करायला सांगणे. असेच जर चालू राहिले तर कोरोना दिवसेंदिवस वाढतच जाईल. खासदार आता तरी नियमांचे पालन करतील आणि करायला लावतील अशी अपेक्षा करू.