कोरोना लसीबद्दल अफवा

'ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ने या अफवेचे पूर्णतः खंडण केले आहे

कोरोना लसीबद्दल अफवा

स्वप्नील कुमावत/नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीला आणीबाणी तत्वावर वापराला मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड या दोन लसींना ही मंजुरी मिळाली आहे. मात्र लसीसोबतच विविध अफवाही बाजारात येत आहेत. कोरोनाची लस घेतल्याने नपुंसकत्व येऊ शकते. ही एक मुख्य अफवा सध्या लोकांना घाबरवते आहे. अनेक जण संभ्रमात पडत आहेत. मात्र DCGI अर्थात 'ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ने या अफवेचे पूर्णतः खंडन केले आहे.

DCGI चे म्हणणे आहे की, कोरोनाची लस ११०% सुरक्षित आहे. कोरोनाच्या लसीबाबत थोडीशी जरी शंका असती तर तिच्या वापराची परवानगी अजिबातच दिली गेली नसती. मात्र लस घेतल्यावर हलका ताप, डोकेदुखी, ऍलर्जीसारखी सामान्य लक्षणं नक्कीच दिसू शकतात.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी एक मोठ वक्तव्य केले होत. ते म्हणाले, की मी भाजपची लस टोचून घेणार नाही. कारण मला भाजपवर विश्वास नाही. सोबतच मिर्जापूरमध्ये समाजवादी पक्षाचे विधानपरिषद सदस्य आशुतोष सिन्हा यांनी सांगितले, की कोविड-19 च्या लसीमध्ये असे काहीतरी आहे, जे लोकांना नुकसानकारक ठरू शकते. या लसीमुळे काहीही होऊ शकेल. अगदी लोक नपुंसकही होऊ शकतील असे ही ते म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.