सापापेक्षाही विषारी आहे हे झाड

1 min read

सापापेक्षाही विषारी आहे हे झाड

याला स्पर्श केल्यानंतर ४८ तासांच्या आतच ते आपला रंग दाखवायला सुरूवात करतात. बघायला जितके आकर्षक वाटते तितकेच ते विषारी आहे.

प्रत्येकालाच झाडांची आवड असते. कुणी आपली आवड जपतात तर कुणाला जागे अभावी आपली आवड जपता येत नाही. परंतु झाड हे आपल्यासाठीच नव्हे तर पर्यावरणासाठी देखील एक महत्वाचा भाग आहे. कारण झाडे आम्हाला ऑक्सीजन तर देतातच यासह अनेक गरजेच्या वस्तू आपण त्यांच्यापासून तयार करतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, जगभरात असे काही झाडे-झुडुपे आहेत ज्यांच्यापासून माणसाला धोका होवू शकतो. लंडनमध्ये अशी एक वनस्पती आढळली आहे, जी होगवीज किंवा किलर ट्री म्हणून ओळखली जाते. वैज्ञानिकदृष्ट्या याचे नाव हेरकिलम मेंटागेजिएनम आहे. ब्रिटनच्या लंकाशायर नदीच्या किनारयावर हे आढळतात. १४ फुटापर्यंतच या झाडांची उंची असते. जर नजर चुकीने कुणी याला स्पर्श केला पुर्ण हाथावर फोड यायला सुरूवात होते. संशोधकांचे असे म्हणने आहे की, याला स्पर्श केल्यानंतर ४८ तासांच्या आतच ते आपला रंग दाखवायला सुरूवात करतात. बघायला जितके आकर्षक वाटते तितकेच ते विषारी आहे. वैज्ञानिकांचे असे म्हणने आहे की, सापापेक्षाही जास्त हे झाड विषारी आहे. जर चुकून याला स्पर्श झाला तर काही तासानंतरच व्यक्तिला जाणवेल की, त्याच्या पुर्ण शरीरावर आग सुरू होते. आणि हळू हळू फोड यायला सुरूवात होते. यामुळे डोळ्यांची दृष्टी देखील जाण्याची शक्यता असते असे डॅक्टरांचे म्हणने आहे. विशेष म्हणजे अजून यावर खात्रीशीर औषध तयार झालेले नाही. विषारी असल्याकारणाने यात आढळणारे सेंसआयजिंग फूरानोकौमारिंस नावाचे रसायन जे याला विषारी बनवतात. ही झाडे वातावरणात ऑक्सीजन आणि कार्बनडायऑक्साइड चा समतोल राखण्यासाठी आपली महत्वाची भुमिका पार पाडतात.