जयपुर: राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून व प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
राजस्थान मध्ये गेल्या तीन दिवसांपासून सत्ता संघर्ष वरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याच आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून व प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. सोबतच पायलट यांच्या तीन समर्थकांची मंत्रीपद देखील काढून घेण्यात आली आहेत. तर पायलट ऐवजी गोविंद सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी
तीन दिवसांच्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचा मोठा निर्णय

Loading...