मुंबई : भारतीय संघाचा क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वता सचिन तेंडुलकर यांनी ट्वीट करत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. माझ्या घरातील इतर सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. मी घरातचं क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व खबरदारी मी घेत आहे, असं सचिन तेंडुलकर यांने म्हटलं आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासामध्ये ६२,२५८ नवीन कोरोना रुग्णांची नाेंद झाली आहे. तर २९१ जणांचा मुत्यु झाला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा १,१९,०८,९१० वर पोहोचला आहे.