सैराट जोडप्याला लोणावळ्यात अटक

तीन जणांवर निटूर पोलिसात गुन्हा दाखल

सैराट जोडप्याला लोणावळ्यात अटक

निटूर / विजय देशमुख : कलांडी ता. निलंगा येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्या प्रकरणी सैराट जोडप्यासह निटूर पोलिसांनी एकाला अटक केली असून एकूण तीन जणांवर निटूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, कलांडी ता. निलंगा येथील जगन्नाथ वाघमारे व त्याचे दोन साथीदार चैतन्य वाघमारे, नितीन वाघमारे दोघे ही (रा. कलांडी ता.निलंगा) यांनी संगणमत करून कलांडी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अमिष दाखवून तसेच फूस लावून दि.२१ मे रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास राहत्या घरातूळ पळवून घेवून गेले.

जग्गनाथ वाघमारे यांना त्यांच्या दोन साथीदाराने चैतन्य व नितीन याने सहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान घटना घडल्यानंतर मुलीच्या वडीलांनी थेट निटूर पोलिस चौकी गाठून सदरील तिघांना विरोधात फिर्याद दिली त्यावरून निटूर पोलिसांत तिघांना विरोधात गुन्हा दाखल झाला.

जगन्नाथ वाघमारे यांनी मुलीस फूस लावून पळवून घेवुन गेल्यानंतर शिरूर अनंतपाळ चे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार सत्यवान कांबळे , पोलिस नाईक विठ्ठल साठे, पोलिस काॅ.हरीदास कांबळवाड यांनी तपासाची चक्रे गतीमान करून आरोपीचा माग काढत थेट पुणे जिल्ह्यातील लोणावळा गाठून मुख्य आरोपी जगन्नाथ वाघमारे व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले घटना घडल्यानंतर अवघ्या कांही दिवसामध्ये निटूर पोलिसांनी आरोपीस पकडल्याने समाधान व्यक्त होत आहे . वरील तिन्ही आरोपी विरोधात कलम ३६३,३४ भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून दोन फरार असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक कदम हे करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.