परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवण्यासाठी 'कृष्णकुंज'वर साकडे

1 min read

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवण्यासाठी 'कृष्णकुंज'वर साकडे

डोंगरी मासळी बाजाराबाहेर बेकायदा मासेविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण सातत्याने वाढत आहे.

मुंबई : डोंगरी येथील बेकायदा मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. ते हटवण्यासाठी डोंगरीतील कोळी महिला आज कृष्णकुंज वर गेल्या. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. कोणतीही वेळ न घेता या महिला राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. परंतु तरी देखील राज ठाकरे त्यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजबाहेर आले. यावेळी राज यांनी कोळी महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

डोंगरी मासळी बाजाराबाहेर (मच्छीमार्केट) बेकायदा मासे विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण सातत्याने वाढत आहे. अतिक्रमण करणारे मासे विक्रेते हे परप्रांतीय असून ते बेकायदा मासे विक्री करत आहेत. परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे कोळी महिलांचा व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे या अनधिकृत मासेविक्री करणाऱ्यांना त्या ठिकाणावरुन हटवण्यात यावे, अशी मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी राज ठाकरे यांनी कोळी महिलांना त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.