गणपती सजावटी मधून कोरोना योद्धयांना  सलाम

1 min read

गणपती सजावटी मधून कोरोना योद्धयांना सलाम

हिंगोलीतील मुलींची अभिनव कल्पना

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली- सार्वजनिक गणपती महोत्सवाच्या बाबतीमध्ये शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. परंतु घरगुती गणपतीच्या सजावटी मधून कोरोना योद्ध्यांना सलाम करीत जनजागृतीपर संदेश पोहोचविण्यासाठी हिंगोली येथील दोन मुलींनी अभिनव संकल्पना राबविली आहे.
हिंगोली शहरातील सरस्वती नगर भागात राहणाऱ्या वैष्णवी अग्रवाल व माही अग्रवाल या दोन मुलींनी आपल्या घरातील गणपतीची सजावट करताना सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूशी लढणाऱ्या योद्ध्यांना सलाम करीत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. याबाबत त्यांनी प्रतिकात्मकरित्या पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, डॉक्टर यांचे आभार व्यक्त केले.

याच बरोबर संसर्गापासून वाचण्याकरीता कराव्या लागणाऱ्या विविध उपाययोजनांचे संदेश देखील गणपतीच्या सजावटीत सामील केले आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर यांनी या मुलींच्या संकल्पनेचे भेट देऊन कौतुक केले. यावेळी मोहनलाल अग्रवाल, निर्मला अग्रवाल,सचिन अग्रवाल, निशा अग्रवाल, सुमित अग्रवाल, विजया अग्रवाल, महेंद्र मुळे, महेंद्र वाढवे, ऍड ढाले आदींची उपस्थिती होती.