सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेना ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करणार- राजेश टोपे

1 min read

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेना ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करणार- राजेश टोपे

धनंजय मुंडेचा एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह

मुंबई:राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.त्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षणं नाहीत.श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारमधल्या तिस-या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, बाधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांचे दोन स्वीय सहाय्यक , चालक यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यमंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते,त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व मंत्र्याना 28 दिवस क्वारनटाईन राहण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी दिलं आहे