सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी होती. मात्र, यावेळी राज्य सरकारचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याने न्यायमूर्तींनी सुनावणी काही काळासाठी तहकूब केली. यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या बेफिकीरीवर संताप व्यक्त केला.
“हे दुर्दैव आहे की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपल्याला विचारतात की कुठे आहेत सरकारी वकील, तेव्हा ते तिथे हजर नसतात. आपले सरकारी वकील तिथे उपस्थित नसणे हे दुर्दैवं आहे, गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव जिथे कुठे असतील तिथून कृपया कोऑर्डिनेट करा”, अशी सूचना संभाजीराजेंनी केली.
“मी कित्येक वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, मुंबई नवी मुंबईत या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने काही तरी पावलं उचलावीत, एवढीच माझी विनंती आहे. मी थकलोय”, असा उद्वेग संभाजीराजेंनी व्यक्त केला.
“मला आश्चर्य वाटतेय. मी काल, परवा, अनेक दिवसांपासून बोलतोय की फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेच आहे. मी हे देखील सांगितले होते की सामान्य डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या सचिवांना कोऑर्डिनेट करायला सांगा. उपसमितीची बैठक घेण्याबाबत त्यांना दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. पण ती मिटिंगही झालेली दिसत नाहीये”, असं संभाजीराजे म्हणाले.
राज्य सरकारचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याने संभाजीराजेंचा संंताप.
राज्य सरकारचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याने न्यायमूर्तींनी सुनावणी काही काळासाठी तहकूब केली.

Loading...