मंगळवेढ्यात वाळू तस्करांचा धुमाकुळ,प्रशासनाचे दुर्लक्ष

मंगळवेढ्यात वाळू तस्करांचा धुमाकुळ,प्रशासनाचे दुर्लक्ष

सोलापूर- जिल्ह्यातील मंगळवेढा येथे वाळू तस्करांनी धुमाकुळ घातला असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले हे स्पष्ट दिसून येते.पोलिस प्रशासनाने या प्रकरणाकडे सोयीस्कररीत्या बघतांना दिसत आहे. त्यामुळे वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनाने आज चक्क पोलिस कर्मचाऱ्या वाहनाखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलिस प्रशासन विरूध्द वाळू माफिया असा संघर्ष मंगळवेढा तालुक्यामध्ये बघायला मिळतो.

गोणेवाडी ते शिरसी या गावा जवळ वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकपने सकाळी ९ च्या दरम्यान शिरसी गावाजवळ हॅटसन डेअरीजवळील वेताळ मंदीरासमोर जोराची धडक देत पोलीस कर्मचारी गणेश सोलनकर यांना दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. जखमी सोलनकर यास १०८ रुग्णवाहिकेतून मंगळवेढा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारापूर्वी त्यास मृत घोषित करण्यात आले. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांस क्रमांक नाही.त्यामध्ये दोघेजण होते त्या मधील एक पळून जाण्यात यशस्वी ठरला तरी एकास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.

झटपट श्रीमंत होण्यासाठी वाळू हा व्यवसाय निवडला असून अनेक बेरोजगारांनी महसूल व पोलीस खात्यातील काहीना हाताशी धरत त्याकडे लक्ष घातले. त्यामुळे या व्यवसायात धाडस वाढले. सदरची माण नदीपात्रातील असल्याचा संशय असून या मार्गावरून कायमस्वरूपी छुप्या पद्धतीने वाळूची चोरटी वाहतूक कायम होत आहे.

शिवाय या मार्गावरून सांगली व कोल्हापूर भागात देखील चढ्या दराने वाळू पुरवली जात असल्यामुळे संबंधित गावच्या पोलीस पाटलाकडून अशा वाहतुकीकडे लक्ष देणे अपेक्षित होते परंतु आज या सगळ्याच्या दुर्लक्षाचा परिणाम त्या पोलिसाला जीव गमावून भोगावा लागला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.