परभणी तालुक्यात स्वच्छता मोहीम

माझ गावं सुंदर गाव उपक्रमांतर्गत ग्राम स्वच्छता मोहीम...

परभणी तालुक्यात स्वच्छता मोहीम

परभणी : जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात 'माझ गाव सुंदर गाव' उपक्रमांतर्गत स्वच्छता आणि शोषखड्डे करण्याची मोहिम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आधारित परभणी तालुक्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

४ मार्च रोजी परभणी तालुक्यातील मांडाखळी या ग्रामपंचायती मध्ये माझ गावं सुंदर गाव उपक्रमांतर्गत ग्राम स्वच्छता मोहिम परभणीचे गट विकास अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी व शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने राबविण्यात आली. तसेच गावातील सिंचन विहिरींचा शुभारंभ देखील करण्यात आला. माझा गाव सुंदर गाव उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सांडपाण्याच्या नियोजनासाठी शोषखड्डयांची निर्मिती करणे, नाल्या - रस्त्यांची स्वच्छता करणे, काटेरी बाभळी काढून त्या ठिकाणी फळ वृक्षांची लागवड करणे, परिसर स्वच्छता करणे, गावफेरी, ग्रापंचायत, शाळा, अंगणवाडीची, प्रा.आ. केंद्र आदी शासकीय कार्यालयांची स्वच्छता करणे, शौचालयाचा नियमित वापर व्हावा म्हणून नागरिकांत जाणीव जागृती करणे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मांडाखळी येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांचे सहकार्य लाभले. यावेळी सरपंच नागेश सिराळ, उपसरपंच शेख मोसीन, पंढरीनाथ घुले, किसन सिराळ, प्रविण सोनटक्के, सचिन लोहट, ग्रामसेवक जावेद शेख यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.