वैयक्तिक फळबाग लागवड शेतकऱ्यासाठी संजीवनी-सीईओ टाकसाळे

चांगल्या उत्पन्नासाठी व आरोग्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा होणार फायदा

वैयक्तिक फळबाग लागवड शेतकऱ्यासाठी संजीवनी-सीईओ टाकसाळे

परभणी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक फळबाग लागवड संजीवनी ठरणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतामध्ये वैयक्तिक फळबाग लागवड करता येणार आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यमान आणि जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

योजनेचा लाभ कोणाला घेता येईल :-
अनुसूचित जाती /जमाती, दारिद्र रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, लहान शेतकरी, सीमांत शेतकरी इत्यादी प्रवर्गातील शेतकरी या फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभ घेण्यासाठी काय आवश्यक आहे :-
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे, लाभार्थी हा जॉब कार्ड धारक असावा, वृक्ष लागवड संवर्धन व जोपासना करण्याची जबाबदारी त्याने स्विकारावी, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारी प्रमाणे कामे करण्याची जबाबदारी स्विकारावी, त्यांनी म ग्रा रो ह यो च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, हजेरी पत्रकाच्या आधारावर मजुरी प्रदान करण्यात येणार आहे.

अशी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया :-
फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रपत्र अ प्रमाणे ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल करावा लागेल, याबाबत तांत्रिक मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी देतील तर फळबाग लागवडीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता पंचायत समितीचे गट विकास अधिकरी यांच्यामार्फत तर तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी देतील.

फळबाग लागवड कार्यक्रमाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन निसर्ग व आरोग्यला संपन्न बनविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी वृक्ष संख्या वाढवण्यासाठी व शाश्वत उत्पन्न वाढीसाठी आवाहन केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.