बा.बा.कोटंबे यांना राज्यस्तरीय संत नामदेव ललित साहित्य पुरस्कार जाहीर

1 min read

बा.बा.कोटंबे यांना राज्यस्तरीय संत नामदेव ललित साहित्य पुरस्कार जाहीर

कोटंबे यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि 'गोष्टी गावाकडच्या' या उत्कृष्ट ग्रंथाच्या निर्मितीबद्दल संत नामदेव ललित साहित्य पुरस्कारासाठी यांची निवड करण्यात आली आहे

विजय कुलकर्णी /परभणी:  ज्येष्ठ साहित्यिक बा.बा.कोटंबे यांना राज्यस्तरीय संत नामदेव ललित साहित्य पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे. कोटंबे यांनी लिहिलेल्या 'गोष्टी गावाकडच्या' या ललित  संग्रहासाठी हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोटंबे यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि 'गोष्टी गावाकडच्या' या उत्कृष्ट ग्रंथाच्या निर्मितीबद्दल संत नामदेव ललित साहित्य पुरस्कारासाठी  यांची निवड करण्यात आली आहे. संयोजक प्रा.डॉ.श्रीराम कऱ्हाळे यांनी दिनांक 16 नोव्हेंबरला  निवडपत्र पाठवले आहे. बा.बा.कोटंबे यांच्या 'मुसाफिर',  'पैंजण',  'काळरात्र', 'अंधार', 'कदाचित', 'गोप्या', 'सुखी जीवनाचा कानमंत्र', 'पालवी', 'सांज पावसाळी' ही पुस्तके प्रकाशित झाले आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.