संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा आठव्यांदा सदस्य

1 min read

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा आठव्यांदा सदस्य

पाकिस्तान म्हणते – ही आनंदाची नाही तर चिंतेची बाब

नवी दिल्लीः भारत आज आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (यूएनएससी) अस्थायी सदस्य झाला आहे. आशिया पॅसिफिक देशांमध्ये बिनविरोध निवडला जाणारा भारत हा एकमेव देश आहे. मात्र पाकिस्तानने यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानुसार ही आनंदाची गोष्ट नाही तर काळजी करण्याची गोष्ट आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, यूएनएससीचे अस्थायी सदस्य होण्यचा भारताला हेतू पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण 15 देश आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, आणि चीन हे स्थायी सदस्य देश आहे. त्याचबरोबर 10 देशांना अस्थायी सदस्यत्व देण्यात आले आहे. यामध्ये बेल्जियम, कोट डी- आइवरी डोमिनिकन रिपब्लिक, गिनीस, जर्मनी, इंडोनेशिया, कुवैत, पेरू, पोलंद, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या समावेश आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, भारताच्या विस्तारवादी अजेंड्यामुळे शेजारील देश असुरक्षित आहेत. त्यांच्या हालजालीमुळें चीन. नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका सर्वच धोक्यात आहे. कुरेशी म्हणाले की काश्मीर भारताच्या पाठीशी आहेत असा एक गैरसमज आहे. जर त्यांना असे वाटत असेल तर त्यांनी स्वतः मुजफफराबाद येथे यावे आणि पाहावे की, किती काश्मिरी त्यांच्याशी सहमत आहेत. काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी पाकिस्तानी अधिका-यांनी भारतीय मंत्र्यांना येथे आमंत्रित करायला हवे.