शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान

शरणकुमार लिंबाळे यांच्या 'सनातन' या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला.

शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान

सोलापुरः सरस्वती सन्मान पुरस्कार २०२० हा मराठितील जेष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहिर झाला आहे. शरणकुमार लिंबाळे यांच्या 'सनातन' या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला.

सरस्वती सन्मान पुरस्कार दिल्लीच्या के. के. बिर्ला फाऊंडेश यांच्या कडून दिला जातो. देशातल्या २२ भाषांतल्या पुस्तकांचे अवलोकन करुन दरवर्षी एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शरणकुमार लिंबाळे कोण?

डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी जन्म झाला. जातीव्यवस्था आणि सामाजिक उतरंड यावर लिंबाळे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या लेखणीने प्रहार केला आहे.१९८६ ते १९९२ या दरम्यान ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून 'अक्करमाशी' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 'अक्करमाशी'चे विविध भाषांत भाषांतरे झाली. याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर आणि २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. बार्शी येथे २०१०मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद शरणकुमार लिंबाळे यांनी भूषवले होते.

'सनातन' कादंबरी काशावर आधारीत आहे.

'सनातन' ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर वेगळा प्रकाश टाकते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान यावर फार काही उल्लेख आढळत नाही.' ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केल्याचे लिंबाळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.