सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात काटछाट - विजय वडेट्टीवार

1 min read

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात काटछाट - विजय वडेट्टीवार

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत.

मुंबई : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही. जे काही पैसे आहेत. त्या कोरोना संकटासाठी खर्च करण्यात येत आहे. सरकार कर्मचाऱ्यांचा पगारीत कपात करु शकते किवां या महिन्यांची पगार करणार नाही. सरकारला कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी कर्ज काढावा लागणार आहे. अशी परिस्थिती सरकारची आहे. मात्र जे कोरोनासाठी काम करतायत त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबत थोडसं मागे पुढं होऊ शकतं. चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे आणि ती पुढच्या डिसेंबरपर्यंत चालेल असं तज्ञ सांगतात. केंद्र सरकारकडून कोणतीही मदत झालेली नाही. पीएम केअर फंडाला मदत करा असं सांगणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजुनही सत्ता गेल्याच्या दुखाःतून बाहेर येऊ शकलेले नाहीत.

सारथीबद्दल काहीजण गैरसमज पसरवताहेत
सारथी संस्था सुरू राहील. यावर्षी देखील सारथी संस्थेसाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. मात्र सारथी बद्दल काहीजण गैरसमज पसरवून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. फक्त प्रशिक्षण देण्यापुरती सारथी मर्यादित राहणार नाही. सारथीला साधारणपणे 38 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. सारथीला आम्ही आर्थिक मदत नक्की करणार आहोत. पण त्यामधे थोडं पुढं मागं होऊ शकतो. कारण आधी कोरोनासाठी काम करणाऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे. येणाऱ्या कॅबिनेट मिटींगमध्ये सारथी बद्दल निर्णय घेणार आहे, असं ते म्हणाले.