सरकारी कार्यालय सात दिवस बंद

1 min read

सरकारी कार्यालय सात दिवस बंद

राज्य सरकारचा कोरोनामुळे मोठा निर्णय

राज्यातील सर्व सरकारी कार्यालय सात दिवस बंद करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व सरकारी कार्यालय पुढील सात दिवस बंद राहतील.
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे कोरोनाशी संबधित आहेत ती सर्व कार्यालय सुरु राहतील.
राज्यात कोरोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर करावा असे नम्र आवाहन डॉ. नितीन राऊत (ऊर्जामंत्री)
कोरोनाचा भारतात शिरकाव होत आहे. तो राखण्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे. रविवारी सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि मॉल बंद करण्याच्या निर्णय घेतला होता. सोमवार 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि मॉल बंद राहणार आहे. सरकारने सर्व अभ्यासक्रमाच्या परिक्षा पुढे ढकल्या आहेत. येत्या काळात होणा-या सर्व निवडणूका तीन महिण्यासाठी स्थगिती दिली आहे.
याबरोबर राज्यातील मोठी मंदिरे देखील बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानी घेतला आहेत. तर राज्यातील पर्यटनाची ठिकाणे पुढील काही दिवस बंद राहणार आहेत. हे सर्व कोरोनाचा पार्दूभाव कमी करण्यासाठी केले जात आहे.
31 मार्च पर्यत कोरोनाचा पादूर्भाव कमी झाला नाही तर सरकार पुढील काही दिवस शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, बंद ठेऊ शकते. सरकार कोरोना रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. तर राज्यातील लोकांना देखील कोरोना राखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. असे वांरवार अवाहन करत येत आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आधिक-यांशी कोरोना संर्दभात बैठका घेत आहेत.
-स्वप्नील कुमावत