सारथीला दिलेल्या निधीचे स्वागत!मात्र महाज्योतीचे काय?

1 min read

सारथीला दिलेल्या निधीचे स्वागत!मात्र महाज्योतीचे काय?

मा.आ.हरिभाऊ राठोड यांचा अजित पवारांना सवाल

सिद्धेश्वर गिरी /प्रतिनिधी: आजपर्यंत घेतलेल्या निर्णयातून ओबीसींना सावत्रपणाची वागणूक देऊन यांच्या विकासाकरिता  राबवण्यात येणाऱ्या निधीमध्ये मोठी कपात करण्यात आलेली होती.यामुळेच पहिल्या सरकारला सोडून दुसऱ्या सरकारची सकारात्मक दिशा ओळखून ओबीसी,घुमंतू-ओबीसी,भटक्या-विमुक्त,मुस्लिम ओबीसी यांच्याबाबत चांगली असल्यानेच या सरकारवर विश्वास तमाम ओबीसी बांधवांनी दाखवलेला आहे.यामुळेच सरकारच्या माध्यमातून शासनाने ओबीसींचे हीत जोपासण्यासाठी व वंचित समाजाचा विकास करण्यासाठी या सरकारने महाज्योतीची निर्मिती केली मात्र महाज्योतीला एक छदामही निधी अद्यापपर्यंत मिळालेला नाही.नुकत्याच झालेल्या निर्णयात अवघ्या दोन तासात सारथी या संस्थेला आठ कोटी रुपये वर्ग करण्यात आले.याबद्दल स्वागत आहे. मात्र सारथीच्या तुलनेत महाज्योती या संस्थेकडून उपेक्षित,वंचित,ओबीसी,भटक्या-विमुक्त,मुस्लिम ओबीसी अशा विविध प्रवर्गातील नागरिकांचा विकास होणार आहे.यासाठी या संस्थेला सारथीच्या दुप्पट म्हणजे सोळा कोटी रूपये निधी देण्याची मागणी मा.आ.हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.त्याचबरोबर त्यांनी ओबीसी समाजाच्या अडचणी असंख्य आहेत.त्याचबरोबर सरकारने नवीन पायंडा पाडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत राठोड यांनी आजपर्यंतचा इतिहास सरकारच्या माध्यमातून अजित पवारांनी मोडीत काढल्याची टीका केली.यात ज्या जातीसाठी संस्था कार्यरत आहे.त्याच संस्थेचे खाते त्याच जातीच्या मंत्र्याकडे असू शकते का?असा सवाल उपस्थित करत आजच्या सारथीच्या निर्णयामुळे घातक पायंडा पडल्याचे दिसते असे मतही त्यांनी नोंदवले आजच्या निर्णयामुळे हा नवा जातियवाद निर्माण झाला असल्याची टिका राठोड यांनी केली आहे.सारथीचे पालकत्व घेतले मग चर्मकार महामंडळ,साठे महामंडळ,नाईक महामंडळ,फुले महामंडळ,यांचे काय?असा प्रतिसवाल त्यांनी पवार यांना उपस्थित केला आहे.त्याचबरोबर राज्याचा कौशल्य विकास विभाग हा उद्योजकता निर्माण करणारा विभाग आहे नियोजन विभाग निधीच्या वाटपाचे नियोजन करणारा आहे.हा विभाग उद्योजकता कशी निर्माण करणार?असा प्रश्न उपस्थित करत मंत्रालयाची फोडाफोडी व विभागांची पळवापळवी आयोग्य असल्याचे मतही राठोड यांनी उपस्थित केले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ओबीसींच्या मोठ्या अपेक्षा आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम असून त्यांनी ओबीसी विषयावर लक्ष देण्याची मागणीही राठोड यांनी त्यांच्या पत्रकातून केली आहे