सततच्या जनता कर्फ्यूमुळे शेतकरी त्रस्त

1 min read

सततच्या जनता कर्फ्यूमुळे शेतकरी त्रस्त

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रामेश्वर मोकाशे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सध्या शेतीतील मोठ्या प्रमाणात कामे चालु असून या कामात शेतकरी व्यस्त आहेत.त्यातच कोरोना या आजाराच्या पार्श्वभुमीवर नेहमी लागू होणा-्या जनता कर्फ्यू मुळे शेतीतील कामे करण्यास अडथळा होत आहे. खतांचा तुटवडा बोगस बियाणे आणि कर्ज प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोनपेठ शाखेकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणुक यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे.या सर्व प्रश्नाची सहानुभूती दाखवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे केली आहे.या निवेदनात त्यांनी असे नमुद केले आहे की,सोनपेठ तालुका म्हणजे मागास तालुका आहे आणि या तालुक्याच्या विकासाला वानवा लागलेली आहे.नुकत्याच झालेल्या पावसात दुबार-तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही बोगस बियाणे प्रकरणही अंधातरी आहे.त्यातच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोनपेठ शाखेकडून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.तसेच यूरिया खताच्या वितरणात अडचणी निर्माण केल्या जात आहेत यात कृषी विभाग व कृषी केंद्रचालक यांचे संगनमत असून यावर कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना बांधावर खत वितरण करण्यात यावा त्याचबरोबर शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही मोकाशे यांनी निवेदनावर नमुद केली आहे.

युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे