उत्तर प्रदेश सरकारच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन.

1 min read

उत्तर प्रदेश सरकारच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन.

उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व उत्तरप्रदेश सरकारच्या हुकूमशाही कारभाराच्या विरोधात हिंगोलीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

हिंगोली: उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व उत्तरप्रदेश सरकारच्या हुकूमशाही कारभाराच्या विरोधात माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
WhatsApp-Image-2020-10-05-at-12.52.59-PM
हाथरस मधील पिडीत मुलगी व त्यांच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज देशभर सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार आज हिंगोलीत जिल्हा काँग्रेस कमिटी कडून शहरातील महात्मा गांधी पुतळ्या समोर काँग्रेस पदधिकारी व कार्यकर्त्यांनी डोक्यावर काळ्या पट्टी बांधून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करुन सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी जि.प गटनेते दिलीप देसाई, शहराध्यक्ष बापुराव बांगर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, अजगर पटेल, शोभा मोगले, मधुकर जामठीकर, डॉ.राजेश भोसले, नामदेव बुद्रुक, एल.जी घुगे, ध्रुपत पाईकराव, केशव नाईक, विलास गोरे, श्रीराम जाधव, बालाजी पारिस्कर, जि.प सदस्य सतिश पाचपुते, भगवान खंदारे, एस.पी.राठोड, कैलाश साळुंके, पंकज जाधव, सुमेध मुळे, अजगर पटेल, संतोष राजेगोरे, नंदकिशोर कदम, राजाराम खराटे, विशाल घुगे, आबेदअली जहागीरदार, बंटी नागरे,गजानन कवडे, अशोक बेले, ससाणे देविदास, चंद्रकांत डुकरे, संजय लोमटे आदींची उपस्थिती होती.