फोनवर बोलू नको म्हणणे जीवावर बेतले

शुल्लक कारणावरून एकाचा खून

फोनवर बोलू नको म्हणणे जीवावर बेतले

निलंगा : दि. १९ फेब्रुवारी राञी ८ वाजता जगन्नाथ किशन शिंदे याला गावातील दहा तरूणांनी घरासमोर बोलावून तू आम्हाला फोनवर मोठ्या आवाजाने बोलण्यास का विरोध करतोस असे म्हणत दहा जणांनी काठी व दगडाने ठेचून जागीच ठार केल्याची घटना निलंगा तालुक्यातील बामणी गावात घडली. याबाबत मयत तरुणाची बहिण सुनिता अर्जून रणदिवे यानी निलंगा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयीत आरोपी बापू ढाले,हाणमंत गायकवाड,राम गायकवाड,गोरख गायकवाड,अरविंद गायकवाड,शेषीकांत गायकवाड,मल्हारी गायकवाड,दिंगबर गायकवाड,शंभो गायकवाड,शाम गायकवाड.राहणार सर्व बामणी ता.निलंगा जि.लातूर यांच्या विरूद्ध निलंगा पोलिस ठाण्यात मयताच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल चोरमले करत आहेत.

दरम्यान गुन्हा दाखल होऊनही पोलिसाकडून संबंधित आरोपीना अकट झाली नसल्यामुळे संतप्त नातेवाईकाना निलंगा पोलिस ठाण्यासमोर राञभर ठिय्या मांडला आहे.पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून आठ आरोपी फरार आहेत.सर्वच आरोपी अटक करावी म्हणून नातेवाईक ठाम आहेत.यामुळे गावात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोशल मिडियाच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढीकडून असे अनेक गैरकर्ते घडत असून किरकोळ कारणाचे पर्यावसन खूनापर्यंत जात आहेत.अशा किरकोळ घटनांना आळा घालण्याची मागणी समाजातून होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.