सोमवारी शाळा उघडणार ?

1 min read

सोमवारी शाळा उघडणार ?

जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनचं घेणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

सुमित दंडुके / औरंगाबाद : राज्य सरकारने येत्या सोमवारपासून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनचं घेणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्यानुसार आता शाळा सुरु करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. याच संदर्भात आज अंतिम निर्णय घेणार असल्याचं प्रशासक आस्तिक पांडेय यांनी सांगितले आहे.
मात्र शाळा सुरु होऊ किंवा न होऊ ऑनलाईन शिक्षण मात्र चालूच राहणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.