औरंगाबादेतील शाळा तीन जानेवारीपर्यन्त बंदच..

1 min read

औरंगाबादेतील शाळा तीन जानेवारीपर्यन्त बंदच..

शाळा जरी तीन जानेवारीपर्यन्त बंद राहणार असल्या तरी शिक्षकांना मात्र शाळेत हजर रहावे लागणार आहे.

सुमित दंडुके / औरंगाबाद : येत्या सोमवारपासून शाळा सुरु होणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्यामध्ये होणारी वाढ लक्षात घेता शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार आज शहरातील स्थानिक प्रशासनाने चर्चा करीत एकूण परिस्थिती पाहता शाळा ३ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. २० डिसेंबर रोजी या संदर्भात आढावा बैठक घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, तोपर्यन्त 3 जानेवारीपर्यन्त शाळा विद्यार्थ्यांसाठी बंदच राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक पाण्डेय यांनी दिली.