जिल्ह्यातील शाळा १५ एप्रिलपर्यंत राहणार बंद

इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले

जिल्ह्यातील शाळा १५ एप्रिलपर्यंत राहणार बंद

परभणी: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी दिले आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये देखील ४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात यावीत,असे सांगण्यात आले आहे.

मागील एक महिन्यापासून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. या संसर्गात आणखी भर पडू नये. याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याचबरोबर ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यात यावेत, असे सांगण्यात आले आहे. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये ३१ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. महाविद्यालये, तसेच शिकवणी वर्ग येथे एकत्रित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता सदर निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासंदर्भात देण्यात आलेल्या निर्णयाची मुदत वाढविण्यात आली असून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, असे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहेत.

याचबरोबर जिल्ह्यात सर्व राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजनावर देखील निर्बंध घालण्यात आले आहे. सदर मुदत वाढवून ती १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात यावीत, असे सांगण्यात आले आहे. विदर्भातील जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या व परभणी जिल्ह्यातून विदर्भातील जिल्ह्यातून कोणत्याही व्यक्ती, वाहनास जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास १५ एप्रिलपर्यंत मनाई करण्यात आली आहे. याचबरोबर १५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील राजगोपालाचारी उद्यानात येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता सदर उद्यान देखील १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवावेत, असे सांगण्यात आले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.