गर्दी पाहून पांडेय भडकले आणि...

नियम न पाळता लोकांची झालेली गर्दी पाहून केली कडक कारवाई...

गर्दी पाहून पांडेय भडकले आणि...

सुमित दंडुके /औरंगाबाद : शुक्रवारी रात्री मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय फेरफटका मारण्यासाठी बंगल्याबाहेर पडले, शहरात रात्र संचारबंदी असतानाही हिमायतबाग परिसरात काही टप-या सर्रास चालू होत्या, त्याठिकाणी लोक विनामास्क गर्दी करुन बसलेले त्यांना दिसले. हे पाहून आयुक्त चांगलेच भडकले आणि त्यांनी तात्काळ अधिका-यांना कारवाईचे आदेश दिले.
amc_action_analysernews
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री अकरा वाजेच्यानंतर सर्व व्यवहार बंद होणे अपेक्षित आहे. मात्र हिमायतबाग परीसरात नागरिकांनी करोनाबद्दलचे नियम पायदळी तुडवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी दि.२७ रोजी सकाळीच पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला आदेश देत हिमायत बाग चौकातील त्या टपऱ्या आणि शेड हटविण्याचे आदेश दिले. पांडेय यांच्या आदेशानुसार पालिकेचे पथक, नागरिक मित्र पथक हिमायतबाग चौकात पोहोचले. या पथका सोबत जेसीबी मशीन होते. जेसीबी मशीनच्या सहाय्याने तीन टपऱ्या आणि पाच शेड जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईच्या वेळी मास्क न घातलेल्या दहा जणांवर देखील पालिकेच्या पथकाने कारवाई केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.