दशनाम युवक प्रतिष्ठाणची सेलु तालुका कार्यकारिणी जाहीर

1 min read

दशनाम युवक प्रतिष्ठाणची सेलु तालुका कार्यकारिणी जाहीर

दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीच्या सेलु तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच सेलु येथे दशनाम युवक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष स्वप्निल(भैय्या)भारती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सिध्देश्वर गिरी/परभणी : सामाजिक प्रश्नावर आपले अस्तित्व निर्माण करत जीवाचे रान करणाऱ्या दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीच्या सेलु तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच सेलु येथे दशनाम युवक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष स्वप्निल(भैय्या)भारती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सेलू तालुक्यातील राधे धामनगाव येथील गोसावी समाजातील जेष्ठ नागरिक बापुराव रामभाऊ गिरी तसेच विठ्ठलबुवा दगडोबा गिरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी वैजनाथ गिरी,प्रतिष्ठाणचे सचिव शाम गिरी,प्रतिष्ठाणचे कोषाध्यक्ष सुरेश पुरी,प्रतिष्ठाणचे जिल्हासंघटक रमेश भारती,प्रतिष्ठाणचे सहसचिव निलेश गिरी,प्रसिध्दीप्रमुख अनुरथ भारती आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून दत्ता रघुनाथ गिरी,तालुका उपाध्यक्ष भागवत सदाशिव गिरी,सचिव सुनिल प्रल्हाद गिरी,कोषाध्यक्ष महेश रघुनाथ भारती,संघटक गजानन भागवत गिरी,प्रसिद्धिप्रमुख सुशांत बाबासाहेब गिरी,संपर्कप्रमुख अर्जुन शिवचरण पुरी,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गोविंद गिरी,शहरअध्यक्ष कृष्णा गजानन भारती सदस्य म्हणून विकास शंकरबुवा गिरी,अनिल प्रल्हाद गिरी,नवनाथ जगन्नाथ गिरी आदींच्या निवडी करण्यात आल्या सदर नियुक्तीचे पत्र वरील नवनियुक्त सर्व पदाधिकारी यांना दशनाम युवक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष स्वप्नील(भैय्या)भारती तसेच इतर मान्यवरांच्या वतीने देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश पुरी यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष दत्ता गिरी यांनी मानले.