सेनेची दादागिरी, भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

भाजपच्या सरचिटणीसाला जबर मारहाण...

सेनेची दादागिरी, भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

औरंगाबाद : मागे काही दिवसांपूर्वी शहरात शिवसेनेचे आ. आंबादास दानवे यांच्याकडुन रिक्षाचालकाला मारहाण झाल्याची घटना ताजी असताना. आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडुन भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्याची घटना सुतगिरणी चौकात मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यलयासमोर घडली आहे.

गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर नेले. तेथे केंद्रे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत केंद्रे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी गोविंद केंद्रे यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

भाजपकडुन पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
गोविंद केंद्रे यांना मारहाणीचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. तसंच भाजप नेत्यांनी या मारहाण प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन देखील केले. तसेच शिवसेना माजी उपमहापौर राजेंद्र जजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना यावेळी देण्यात आले आहे.

सेनेला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही- बापू घडामोडे
शिवसेनेच्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. भाजप आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही. याला जशाचं तस उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.