मुलांना शाळेत पाठवताय ! मग अगोदर हे वाचाच.

1 min read

मुलांना शाळेत पाठवताय ! मग अगोदर हे वाचाच.

विशेष म्हणजे यातील ७३.५% रुग्ण १४ वर्षांखालील आहे. अशा मुलांमध्ये करोना संसर्ग होतो मात्र लक्षणं दिसत नाही.

सुमित दंडुके : देशातील बऱ्याच राज्यांनी शाळा सुरु केली आहे. आता महाराष्ट्रातही २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
पण मुलांना शाळेत पाठवणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत सुरक्षित आहे. याबद्दल विचार करायला लावणारी एक बातमी दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने दिली आहे.
corona-report
एका रिपोर्टनुसार सर्व पॉसिटीव्ह रुग्णापैकी ४०% रुग्णामद्ये लक्षणं दिसत नाही. विशेष म्हणजे यातील ७३.५% रुग्ण १४ वर्षांखालील आहे. अशा मुलांमध्ये करोना संसर्ग होतो मात्र लक्षणं दिसत नाही. त्यामुळे ही मुलं करोना पॉसिटीव्ह आहेत की नाही हे शोधणे फार कठीण आहे. ही बाब निश्चितच पालकांची चिंता वाढवणारी आहे.
schools-coronavirus-1590998858-1591973086-1