काँग्रेस ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन

एकनाथ गायकवाड यांचे कोरोनानी निधन

काँग्रेस ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड  यांचे निधन

मुंबईः काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज १०.०० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविले होते. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचे सख्य होते. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते. गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.